एक्स्प्लोर
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानाला जाणार की नाही? अमित शाहांच्या वक्तव्यानं चित्र स्पष्ट, आता पीसीबीपुढं एकच पर्याय
Champions Trophy : पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. भारताचे सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याचा पीसीबीचा प्रस्ताव आहे.
अमित शाह, भारत पाकिस्तान
1/5

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार आहे. 2023 च्या वर्ल्डकपमधील गुणतालिकेतील पहिले आठ संघ या स्पर्धेसाठी पात्रठरले आहेत. ही स्पर्धा पाकिस्तानात होत असल्यानं भारतीय संघ सहभागी होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजून पर्यंत भारत सरकार किंवा बीसीसीआयनं याबाबत अधिकृत भूमिका मांडलेली नाही.
2/5

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका वक्तव्यामुळं भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळायला जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. जो पर्यंत दहशतवाद पूर्णपणे संपणार नाही तोपर्यंत पाकिस्तान सरकारसोबत कसल्याही प्रकारची चर्चा होणार नाही, असं अमित शाह म्हणाले.
3/5

अमित शाह यांच्या या वक्तव्यामुळं भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतचा निर्णय भारत सरकारच्या हातात असल्याचं म्हटलं होतं.
4/5

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रीड मॉडेलनं खेळवण्याच्या मनस्थितीत नाही. दुसरीकडे भारत पाकिस्तानला न गेल्यास याच मॉडेलचा वापर करावा लागेल. श्रींलका किंवा यूएई हे दोन पर्याय यासाठी आहेत. मात्र,पीसीबी देखील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे.
5/5

भारतीय क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी व्हायचं असल्यास आयसीसीला पीसीबीसोबत चर्चा करुन हायब्रीड मॉडेलचा वापर करावा लागेल. हायब्रीड मॉडेलवर सहमती झाली नाही आणि भारतीय संघ पाकिस्तानला न जाण्यावर ठाम राहिल्यास त्यांना स्पर्धेबाहेर जावं लागेल, या स्थितीत श्रीलंकेला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळू शकते.
Published at : 07 Sep 2024 09:05 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























