एक्स्प्लोर
Axar Patel : येईल त्या ओवरमध्ये विकेट, इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवले, अक्षर पटेलसमोर इंग्रजांनी गुडघे टेकले!
Axar Patel : भारतानं अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अक्षर पटेलनं टाकलेल्या चार ओव्हरमध्ये भारताला विकेट मिळाली.
अक्षर पटेलसमोर इंग्रजांनी गुडघे टेकले!
1/5

इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरनं अर्शदीप सिंग टाकत असलेल्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये जोरदार फटकेबाजी केली होती. बटलरनं 23 धावा करत इंग्लंडला आश्वासक सुरुवात करुन दिली. रोहितनं वेगवान गोलंदाजांना मार पडतोय हे लक्षात येताच थेट अक्षर पटेलच्या हातात बॉल दिला. अक्षर पटेलच्या पहिल्याच ओवरच्या पहिल्या बॉलवर जोस बटलर रिवर्स स्वीप मारायला गेला. बॅटच्या वरच्या भागात बॉल लागून हवेत गेला. रिषभ पंतनं यावेळी कोणतीही चूक न करता कॅच घेतला.
2/5

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये अक्षर पटेलनं मिशेल मार्शचा कॅच घेत भारताला मोठं यश मिळवून दिलं होतं. यावेळी इंग्लंडच्या इनफॉर्म कॅप्टनची विकेट घेत अक्षर पटेलनं विकेटची माळ लावली.
Published at : 28 Jun 2024 06:48 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























