शाहरुख खान : बॉलिवूडचा बादशाहही गिफ्ट देण्याच्या बाबतीत कोणाच्या मागे नाही. त्याने अभिषेक बच्चनला हार्ले डेविडसन मोटरबाईक, फराह खानला मर्सिडीज बेंड आणि रा.वन टीमला 1 कोटी रुपयांच्या 5 BMW गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत. यात रजनीकांत, अर्जुन रामपाल आणि अनुभव सिन्हा यांचा सामवेश आहे.
2/5
सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांची मैत्री जगजाहिर आहे. सलमानने जॅकलिनला वांद्र्यात एक 3 BHK फ्लॅट आणि ऑडी कार भेट म्हणून दिल्याचं म्हटलं जातं.
3/5
सलमान खान : सलमान खान कायमच आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटवस्तू देत असतो. बहिण अर्पितावर त्याचा जीव आहे. यामुळेच अर्पिताचं लग्न झालं त्यावेळी सलमानने तिला मुंबईतील कार्टर रोड परिसरात 16 कोटी रुपयांचा फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला. याशिवाय अर्पिता आणि तिचा पती आयुषला एक रोल्स रॉयस फॅण्टम कारही भेट दिली आहे, या कारची किंमत चार कोटी रुपये आहे.
4/5
नातं, मैत्री कशी निभवावी हे बॉलिवूड कलाकारांना चांगलंच अवगत आहे. त्यामुळेच ते अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तींना महगड्या भेटवस्तू देण्यात मागेपुढे पाहत नाहीत. जाणून घेऊया अशाच काही कलाकारांबद्दल ज्यांनी महागड्या भेटवस्तू देऊन मित्र-मैत्री आणि नातेवाईकांना खूश केलं.
5/5
आदित्य चोप्रा : निर्माता दिग्दर्शक आदित्य चोप्राला आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल फारशी चर्चा केलेली आवडत नाहीत. पण काही गोष्टी लपून राहत नाही. आदित्यने पत्नी राणी मुखर्जीला 1.25 कोटी रुपयांची ऑडी A8 W12 आणि एक आलिशान बंगला भेट म्हणून दिला आहे.