रिहानाने या मुद्द्यावर भाष्य केल्याने भारतात सोशल मीडियात हंगामा होत असून अभिनेत्री कंगना रनौतने तिच्यावर सडकून टीका केली आहे. तर अनेकांनी तिचे अभिनंदन केलं आहे.
2/7
रिहानाच्या शेतकरी आंदोलनावरील या ट्वीटनंतर भारतात तिच्या नावाच्या गुगल सर्चमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तिच्या 10 कोटी संख्येने असलेल्या ट्विटर फॉलोअर्समध्ये काही वेळेतच दहा लाखांची अतिरिक्त भर पडली आहे.
3/7
आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत रिहानाने आठ ग्रॅमी पुरस्कार आणि 14 बिलबोर्ड संगीत पुरस्कार जिंकले आहेत. तिच्या अनेक गाण्यांनी बिलबोर्ड हॉट 100 या यादीत स्थान मिळवलंय.
4/7
भारतातील आंदोलनावरील ट्वीट केल्यानंतर तिने म्यानमारमधील राजकीय घडामोडींवर एक ट्वीट केलंय.
5/7
रिहानाने अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन पॉलिसीवर टीका केली होती.
6/7
अमेरिकन पॉप स्टार रिहाना ही जगभरातील अनेक संवेदनशील मुद्द्यावर आपले मत व्यक्त करत असते. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा एक फोटो शेअर करत तिने 'आपण या विषयावर का बोलत नाही?' असा सवाल उपस्थित केलाय.
7/7
या आधीही तिने अनेक विषयांवर कोणाचीही पर्वा न करता खुलेपणानं आपली मतं व्यक्त केली आहेत.