मान्या लहान असताना गरीबीमुळे घरात अनेकदा इतर सदस्यांप्रमाणे तिलाही उपाशी झोपावं लागत होतं, एबीपी न्यूजशी बोलताना मान्यानी ही माहिती दिली.
2/6
मुंबईची मान्या सिंह 'फेमिना मिस इंडिया 2020'ची उपविजेती ठरली आहे. मान्याचा मिस इंडिया उपविजेती पर्यंतचा प्रवासही तितकाच खडतर होता.
3/6
आई-वडिलांना असं वाटायला नको की घरात एखादा मोठा मुलगा असयला हवा होता, ज्याने दोन पैसे कमावले असते, त्यामुळे मान्याने कॉलेजला असतानाच नोकरी सुरु केली होती.
4/6
वयाच्या 14 व्या वर्षापासून काम करण्यास सुरुवात केली. मी 'पिझ्झा हट' मध्ये काम करत होते आणि मी लोकांची भांडी देखील घासली आहेत, असं मान्याने सांगितलं.
5/6
मान्याची घरची आर्थिक स्थिती बिकट आहे. मान्याचे वडील मुंबईत रिक्षाचालक आहेत.
6/6
आई-वडिलांकडे मान्याच्या शालेय शिक्षणासाठी देखील पैसे नव्हते. मुलीच्या शिक्षणाचे पैसे देऊ शकत नाही पण तिला शाळेत शिक्षण घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती तिच्या पालकांनी केली होती. त्यामुळे ते दरवर्षी फक्त परीक्षा शुल्क देत होते.