एक्स्प्लोर
Yerwada Jail Tourism | आजपासून येरवडा कारागृहात 'जेल पर्यटना'ला सुरुवात, राज्यातील हा पहिलाच उपक्रम
1/10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रसिध्द असा पुणे करार झाला तो याच येरवडा कारागृहात गांधी यार्ड असलेल्या आंब्याच्या झाडाखाली झाला. त्या झाडाची सुध्दा योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे.
2/10

येरवडा कारागृहास पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज करताना पर्यटक म्हणुन भेट देणाऱ्या व्यक्तींची नावे व मुलभुत तपशील याचा उल्लेख करणे आवश्यक राहिल. अधीक्षक येरवडा कारागृह यांच्या yerwadacpmh@gov.in किंवा spycppune@gmail.com या मेलवर अथवा प्रत्यक्षपणे कारागृह येथे किमान सात दिवस अगोदर अर्ज करावा लागेल.
3/10

महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या थोर नेत्यांना ब्रिटिशांनी येरवडा कारागृहात कैद करुन ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत व ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या थोर नेत्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण देत राहतात.
4/10

हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठं जेल आहे. तब्बल 512 एकर परिसरात पसरलेल्या या जेलमध्ये एकाच वेळी 5000 कैदी राहू शकतात. दक्षिण आशियातील मोठ्या जेलच्या यादीत येरवडाचे नाव आहे.
5/10

शाळा/कॉलेज/विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभाग याद्वारे प्रथमतःच 'जेल पर्यटन' सुरु करीत आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील.
6/10

येरवडा तुरुंगात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'जेल पर्यटना'ला सुरुवात करण्यात आली. हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
7/10

महात्मा गांधीजींना बराच कालावधी या तुरुंगात काढावा लागला. त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे जतन केलं गेलंय.
8/10

इ.स. 1899 मध्ये चापेकर बंधूना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली. तसेच जनरल वैद्य यांच्या हत्येप्रकरणी कुप्रसिध्द जिंदा व सुखा यांना सुध्दा येरवडा कारागृहातील वधस्तंभावर फाशी देण्यात आली आहे.
9/10

रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी जाहीर केलेल्या जातीय निवाड्याला विरोध करुन महात्मा गांधींनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरु केलं होतं. त्यावर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींमध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी प्रसिद्ध पुणे करार याच ठिकाणी करण्यात आला होता.
10/10

देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात येरवडा आणि इतर तुरुंगांचं खूप महत्व आहे. अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. राज्यात पहिल्यांदाच 'जेल पर्यटन' हा उपक्रम सुरु केला जात आहे. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना या उपक्रमात जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती घेता येईल.
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
राजकारण
आरोग्य
























