एक्स्प्लोर
Prince Philip Dies At 99 | राणी एलिझाबेथ (II) आणि प्रिन्स फिलिप यांच्या सहजीवनाच्या प्रवासातील काही खास क्षण
feature
1/9

ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचे पती प्रिंस फिलिप यांचं शुक्रवारी निधन झालं. ते 99 वर्षांचे होते. लंडनमधील बकिंघम पॅलेसनं याबाबत अधिकृत माहिती दिली. प्रिन्स फिलिप यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग असंही म्हटलं जायचं. प्रिंस फिलिप यांच्या निधनानं ब्रिटनमध्ये शोककळा पसरली आहे. ब्रिटनच्या ऐतिहासिक इमारतींवरील ध्वज त्यांच्या सन्मानार्थ खाली उतरवले आहेत. तसेच राष्ट्रीय शोक देखील जाहीर करण्यात आला आहे.
2/9

प्रिन्स फिलिप यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 16 फेब्रुवारीला लंडनच्या किंग एडवर्ड सप्तम हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. 16 मार्च रोजी त्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळाली होती. मात्र त्यांच्यावर हृदयरोगासंदर्भात उपचार सुरु होते. अशात शनिवारी सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Published at : 10 Apr 2021 07:29 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
वर्ल्डकप
व्यापार-उद्योग
























