एक्स्प्लोर
Pit Bull Attack : पिट बुलच्या जीवघेण्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकली जखमी, चेहऱ्यावर लागले 1000 टाके
Pit Bull Attack : जगातील सर्वात धोकादायक मानली जाणारी कुत्र्याची प्रजाती म्हणजे पिट बुल (Pit Bull). एका पिट बुलने सहा वर्षीय चिमुकलीवर जीवघणा हल्ला केला. (PC : istock)

Pit Bull Dog Attack
1/10

कुत्र्याने चिमुकलीच्या चेहऱ्यावर ओरखडे काढले. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्या चेहऱ्यावर 1000 टाके लावण्यात आले आहेत. (PC : istock)
2/10

अमेरिकेमध्ये (America) ही धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षाच्या मुलीवर पिट बुल कुत्र्याने हल्ला केला. (PC : istock)
3/10

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून तिच्या चेहऱ्यावर 1000 टाके लागले आहेत. (PC : istock)
4/10

मीडिया रिपोर्टनुसार, 18 फेब्रुवारी रोजी लिली नावाची सहा वर्षांची मुलगी शेजाऱ्यांच्या घरी तिच्या मित्रासोबत खेळत होती. यावेळी मित्राची आई मादा पिटबुलसोबत तिथे उपस्थित होती. (PC : istock)
5/10

पिट बुलने संधी साधत चिमुकल्या लिलीवर हल्ला केला आणि तिला ओरखडायला सुरुवात केली. लिलीच्या चेहऱ्यावर चावा घेतला. या घटनेत लिली गंभीर जखमी झाली. (PC : istock)
6/10

लिलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे लिलीवर शस्रक्रिया करण्यात आली. तिच्या चेहऱ्यावर 1000 टाके लागले असून श्वासोच्छवासासाठी नळी लावण्यात आली आहे.(PC : istock)
7/10

चिमुकलीच्या चेहऱ्यावरील त्वचेला टाके लावण्यात आले आहेत, मात्र तिचा चेहरा विद्रूप झाला आहे. (PC : istock)
8/10

शस्त्रक्रियेनंतरही चिमुकलीच्या तब्येत फार गंभीर आहे. या मुलीला आता श्वासोच्छवासासाठी ट्यूब लावण्यात आली आहे.(PC : istock)
9/10

लिलीची आई डोरोथी नॉर्टनने प्रतिक्रिया देत म्हटलं की, लिली टेबलावर बसली तेव्हा कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. लिलीने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तिचे खांदे वर केले, त्यामुळे कुत्रा तिच्या मानेला चावू शकला नाही. (PC : istock)
10/10

त्यानंतर तिच्या मैत्रिणीची आई बाथरुममधून बाहेर आली. ती बाहेर पळत सुटली कारण तिची दुसरी लहान मुलगी रडत होती. बाथरुममधून बाहेर येताच तिने कुत्र्याच्या तावडीतून लिलीची सुटका केली. (PC : istock)
Published at : 03 Mar 2023 01:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
