एक्स्प्लोर
Advertisement

Sun Flare : सौरवादळामुळे सूर्यावर मोठा स्फोट, लाखो हायड्रोजन बॉम्बएवढा धमाका
Nasa Solar Flare : सौरवादळामुळे सूर्यावर मोठा स्फोट झाला आहे. हा गेल्या चार वर्षांतील सूर्याच्या पृष्ठभागावर सर्वात मोठा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे.

Nasa Solar Flare (PC : istockphoto)
1/10

सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने काही दिवसांपूर्वी सूर्यावरील या स्फोटाची शक्यता वर्तवली होती. (PC : istockphoto)
2/10

स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट 'AR 2838' नावाच्या सनस्पॉटवर झाला आहे. हा आतापर्यंतचा चार वर्षांतील सर्वात मोठा सोलर फ्लेअर स्फोट असल्याचे मानले जाते. (PC : istockphoto)
3/10

सूर्य (Sun) सौरमालेतील मुख्य ऊर्जा स्त्रोत आहे. सूर्याचा सूर्यमालेतील इतर ग्रहांवर परिणाम होत असतो. (PC : istockphoto)
4/10

सूर्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला एक सनस्पॉट होता, त्यावर स्फोट झाला. येत्या काही आठवड्यांत हा सनस्पॉट जागा बदलण्याचीही शक्यता आहे. (PC : istockphoto)
5/10

हा सनस्पॉट काही काळ त्याच जागी राहिला तर तो पृथ्वीवरूनही दिसू शकतो. अटलांटिक महासागरावरील शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआउटमुळे पृथ्वीवरील सौरवादळाचे परिणाम जाणवले. (PC : istockphoto)
6/10

सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही नासाने आपल्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेचा वापर करून सौरवादळाची फोटो टिपला होता. (PC : istockphoto)
7/10

सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या सौर ज्वाळा (Sun Flare) तयार होतात यालाच सौर स्फोट (Sun Explosion) किंवा सौरवादळ (Sun Strom) असे म्हणतात. (PC : istockphoto)
8/10

सौर ज्वाळा पृथ्वीच्या दिशेने आल्यास याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. (PC : istockphoto)
9/10

सूर्यावरील चुंबकत्वामुळे तापमान वाढून हे स्फोट होतात. या स्फोटामुळे नंतर सौर वादळ तयार होतं. सूर्यावर होणारे स्फोट अणुबॉम्बइतके शक्तिशाली असू शकतात (PC : istockphoto)
10/10

या सौर ज्वाळामुळे ज्वालामुखी आणि रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड्स, GPSवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अंतराळयान आणि अंतराळवीरांनाही धोका निर्माण होऊ शकतो. (PC : istockphoto)
Published at : 07 Jan 2023 10:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
क्रीडा
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
