एक्स्प्लोर
PM Modi France Visit: राष्ट्रपती मॅक्रॉन यांना सितार, तर पंतप्रधान एलिझाबेथ यांना मार्बल टेबल; फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान मोदींकडून खास गिफ्ट
PM Modi Visit: फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यूएईला (UAE) रवाना झाले आहेत. येथे पंतप्रधान मोदींनी भारत आणि फ्रान्समधील व्यावसायिक नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या.
PM Modi Paris Visit
1/7

13 आणि 14 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न, फ्रान्सच्या नॅशनल असेंब्ली स्पीकर येले ब्रॉन-पिव्हेट, फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन, फ्रेंच सिनेटचे जेरार्ड लॉचर यांना वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या.
2/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेंच नॅशनल असेंब्लीचे स्पीकर याएल ब्रॉन-पिवेट यांना हातानं विणलेला 'सिल्क काश्मिरी कार्पेट' भेट दिला. काश्मीरचे हातानं विणलेले रेशमी गालिचे त्यांच्या मऊपणा आणि कारागिरीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत.
3/7

पंतप्रधान मोदींनी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांना 'मार्बल इनले वर्क टेबल' भेट दिली. संगमरवरी बनवलेल्या सर्वात आकर्षक कलाकृतींपैकी एक म्हणजे संगमरवरी इनले वर्क.
4/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांना चंदनाच्या पेटीत पोचमपल्ली सिल्क इकत साडी भेट दिली.
5/7

याशिवाय पीएम मोदींनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना चंदनाची सतार भेट दिली आहे. चंदनावर नक्षीकाम करण्याची कला शतकानुशतकं विकसित झाली आहे.
6/7

फ्रान्सच्या सिनेटचे जेरार्ड लॉर्चर यांनाही पंतप्रधान मोदींनी एक खास भेट दिली. ही भेट म्हणजे चंदनाच्या लाकडावर हातानं कोरलेली मूर्ती.
7/7

यासोबतच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी प्रॉस्ट यांची कादंबरी आणि शार्लेमेन बुद्धिबळपटूंची प्रतिकृतीही पंतप्रधानांना भेट दिली. मॅक्रॉन यांनी पंतप्रधानांना 1916 साली फ्रेम केलेलं चित्रही भेट दिलं.
Published at : 15 Jul 2023 11:38 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
























