समुद्राचे पाणी खारट का असते रे भाऊ...; मीठ नेमकं येतं तरी कुठून?
Sea Water: समुद्राचे पाणी इतके खारट आहे की ते पिण्यासाठी अजिबात वापरता येत नाही.
By : मुकेश चव्हाण | Updated at : 14 Sep 2024 12:31 PM (IST)
sea water salt
1/8
समुद्र आणि महासागरांचे पाणी खारट आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु याचे कारण फार कमी लोकांना माहित आहे.
2/8
समुद्राचे पाणी इतके खारट आहे की ते पिण्यासाठी अजिबात वापरता येत नाही. समुद्रात इतके मीठ कोठून आले, नक्की जाणून घ्या....
3/8
आपल्या पृथ्वीवर जवळपास 70 टक्के पाण्याचा साठा आहे. त्या साठ्यापैकी 97 टक्के पाणी समुद्रात आहे.
4/8
अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, महासागरामध्ये इतकं मीठ आहे की जर पृथ्वीवरील महासागरातून संपूर्ण मीठ बाहेर काढलं आणि जमिनीवर पसरवले तर त्याचे जवळपास 500 मीटर उंच थर बनलतील.
5/8
समुद्रात मीठाचे दोन स्त्रोत आहेत. महासागरातील बहुतेक मीठ नद्यांमधून येते.
6/8
पावसाचे पाणी थोडेसे अम्लीय असते, जेव्हा हे पाणी जमिनीच्या खडकांवर पडते तेव्हा ते नष्ट होते आणि त्यातून तयार होणारे आयन नद्यांमधून महासागरात पोहोचतात. ही प्रक्रिया लाखो-करोडो वर्षांपासून सुरू आहे.
7/8
समुद्रात येणाऱ्या मिठाचा आणखी एक स्रोत म्हणजे समुद्रतळातून येणारे थर्मल द्रव. हे विशेष द्रव महासागरातील सर्व ठिकाणाहून येत नाहीत, तर पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात असलेल्या छिद्र आणि विवरांमधून येतात.
8/8
या छिद्रे आणि भेगांद्वारे समुद्राचे पाणी पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात येते आणि गरम होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडतात.