एक्स्प्लोर
Sindhutai Sapkal : जाणून घेऊया सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास!
sindhutai
1/11

Sindhutai Sapkal : 'अनाथांची माय' अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास वयाच्या 75 व्या वर्षी संपला. त्यांच्या या सोनेरी प्रवासाचा घेतलेला आढावा...
2/11

आई-वडिलांना मुलगी नको होती, 'नकुशी' होती म्हणून नाव चिंधी ठेवलं...जन्मापासून सुरु झालेला चिंधीचा हा संघर्ष लग्न झाल्यानंतरही कायम राहिला, नवऱ्यानेच चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर गावाने वाळीत टाकलं. आयुष्यात भीक मागून खायची वेळ आली...मग जगण्यासाठी शेवटी स्मशान गाठलं. पण समोर आलेल्या संकटांच्या छाताडावर बसून त्यावर मात केली आणि हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं. 'अनाथांची माय' असलेल्या सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांचा हा जीवनप्रवास. सिंधुताईंची प्राणज्योत आज मावळली.
Published at : 05 Jan 2022 11:29 AM (IST)
आणखी पाहा























