एक्स्प्लोर
Sangli : कुठेही सापडणार नाही, तुझ्याच आठवणीत जगत राहीन स्टेटस ठेवत तरुणाची वारणा नदीत उडी
वारणा नदीत शोध घेण्यासाठी आज (6 ऑगस्ट) सकाळी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे. तुषार हा मूळचा बिळाशीचा आहे. तो मांगलेमध्ये आजोळी आईसह रहात होता.

Sangli Crime
1/10

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील मांगले आणि सावर्डे बंधाऱ्यावरून तरुणाने मोबाईलला स्टेटस ठेवून नदीत उडी मारली आहे.
2/10

ही घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. तुषार गणपती पांढरबळे (वय 24) असे त्याचे नाव आहे.
3/10

स्टेटसवरून त्याने नाजूक प्रकरणातून टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.
4/10

वारणा नदीत शोध घेण्यासाठी आज (6 ऑगस्ट) सकाळी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे.
5/10

तुषार हा मूळचा बिळाशीचा आहे. तो मांगलेमध्ये आजोळी आईसह रहात होता.
6/10

तो मांगलेत खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता.
7/10

नदीत उडी मारण्यापूर्वी काही तास अगोदर त्याने मोबाईलच्या स्टेटसला मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी झोकून दिले, कुठेही सापडणार नाही. तुझ्याच आठवणीत जगत राहिन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही, असा मजकूर ठेवला होता.
8/10

काल (6 ऑगस्ट) दुपारी तो तीनच्या सुमारास मांगले सावर्डे बंधाऱ्याकडे तुषार गेला.
9/10

त्याचे बंधाऱ्यावर बराच वेळ मोबाईलवर कोणाशी तरी बोलणे सुरू होते. त्यानंतर त्याने नदीत उडी मारली.
10/10

त्याठिकाणी मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तुषारने उडी मारल्यानंतर नदीच्या पाण्याच्या प्रवाहात तो दिसेनासा झाला.
Published at : 06 Aug 2023 04:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
