एक्स्प्लोर
Sangli Ganesh Darshan : तासगावमधील श्री गणपती पंचायतनचा 244 वा रथोत्सव उत्साहात; दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन
रथ ओढण्यास सुरवात झाल्यानंतर गुलाल व पेढ्यांची उधळण करण्यात आली. मानवी मनोरे, झांजपथक, समोर दिमाखात चालणारी ‘गौरी’ हत्तीण यामुळे गणपती मंदिर समोरचा संपूर्ण परिसर मंगलमय वातावरणाने नाहून गेला होता.

Sangli Ganesh Darshan
1/10

तासगावमधील श्री गणपती पंचायतनचा 244 वा रथोत्सव उत्साहात पार पडला.
2/10

गणपती पंचायतन संस्थानच्या ऐतिहासिक दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन देखील करण्यात आले.
3/10

मंगलमुर्ती मोरयाच्या घोषात बारा बलुतेदार आणि भाविक गणरायाचा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढतात.
4/10

गणपती मंदिर ते समोर अर्धा किमीवर असलेल्या श्री काशिविश्वेश्वर मंदीरापर्यंत बारा बलुतेदार हा रथ ओढत नेतात.
5/10

रथ ओढण्यास सुरवात झाल्यानंतर गुलाल व पेढ्यांची उधळण करण्यात आली.
6/10

रथासमोरील मानवी मनोरे, झांजपथक, समोर दिमाखात चालणारी ‘गौरी’ हत्तीण यामुळे गणपती मंदिर समोरचा संपूर्ण परिसर मंगलमय वातावरणाने नाहून गेला होता.
7/10

श्री गणपती पंचायतन देवस्थान संस्थानचे विश्वस्त आणि मानकऱ्यांच्या भक्तिभावपूर्ण योगदानाने परंपरेचा लौकिक वृद्धिंगत होत आहे.
8/10

तासगावचे गणेशमंदिर हे दाक्षिणात्य स्थापत्यकलेचा वारसा म्हणूनच ओळखले जाते.
9/10

उजव्या सोंडेची गणेशमूर्ती हेदेखील अनोखेपण आहे.
10/10

रथोत्सवासाठी दीड लाखाहून अधिक लोक येत असतात.
Published at : 20 Sep 2023 03:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion