एक्स्प्लोर
पुण्यात वाहनासकट दुचाकीस्वाराला टोईंग व्हॅनमध्ये भरलं! नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्याची ही कुठली पद्धत?
Feature_Photo_7
1/6

पुण्यात वाहनासकट दुचाकीस्वारालासुद्धा टोईंग व्हॅनमध्ये भरल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नानापेठ परिसरात वाहतुक पोलिसांनी ही करामत केली.
2/6

संबंधित दुचाकीस्वाराची दुचाकी नो-पार्किंग झोनमध्ये असल्याचा दावा करत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेवर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.
3/6

पुण्यात वाहतूक पोलिसांनी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग व्हॅनमध्ये भरलं. ही घटना काल दुपारी घडली. या घटनेनंतर नो-पार्किंगमध्ये गाडी असली तरी कारवाईची ही पद्धत कितपत योग्य आहे? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
4/6

सर्वाधिक दुचाकी वाहनांचं शहर म्हणून पुण्याला ओळखलं जातं. त्याचबरोबर सातत्यानं या दुचाकी वाहनांची संख्या सातत्यानं वाढत आहे.
5/6

सध्या पुणे शहरात पार्किंगची समस्या सध्या निर्माण झाली आहे. अनेकदा पुणे वाहतूक पोलीस आणि पुणेकरांमध्ये अनेकदा वाद झाल्याच्या घटानाही समोर आल्या आहेत.
6/6

अनेकदा वाहतूक पोलिसांची अरेरावी दर्शवणारे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले आहेत. नानापेठ परिसरात घडलेली घटना ही त्यापैकीच एक. या घटनेवरुन अनेक आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Published at : 20 Aug 2021 03:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग


















