एक्स्प्लोर
Pune News : पिंपरी-चिंचवड ते गेट वे ऑफ इंडिया सायकलवारी; 26/11 च्या वीरजवानांना अनोखी श्रद्धांजली
पिंपरी-चिंचवड ते गेट वे ऑफ इंडिया सायकलवारी करुन 26/11 च्या वीरजवानांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.
pune news
1/8

चिंचवड येथील सायकल प्रेमींनी 26/11 मधील शहीद जवानांना गेट वे ऑफ इंडिया पर्यंत सायकलवर प्रवास करून आज (रविवारी) सकाळी मानवंदना दिली.
2/8

image 2 चिंचवड येथील इको पेडलर्स ग्रुप, हंटर्स ट्रेकिंग आणि सोशल क्लब ग्रुपच्या वतीने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
3/8

अकलूज येथील रॉयल रायडर्स ग्रुपचे देखील त्यांना सहकार्य लाभले.
4/8

या उपक्रमाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. चिंचवड येथील चापेकर पुतळ्यापासून शनिवारी रात्री नऊ वाजता ज्येष्ठ सायकल पटूंनी हिरवा झेंडा फडकावला.
5/8

57 पुरुष, 4 महिलांनी या सायकल प्रवासामध्ये भाग घेतला होता. आज (रविवारी ) पहाटे सहा वाजता हे सर्व सायकलपटू गेट ऑफ इंडिया जवळ पोहोचले.
6/8

26/11 चा भारतासाठी मोठा हल्ला होता.
7/8

अनेक राजकीय नेत्यांनीदेखील या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
8/8

सगळ्यांनी सायकलवारी करत श्रद्धांजली वाहिली.
Published at : 26 Nov 2023 06:31 PM (IST)
आणखी पाहा























