खासदार संभाजीराजे छत्रपती सोमवारी किल्ले विसापूर व लोहगडास भेट दिली
2/8
एकमेकांना लागूनच असलेल्या विसापूर व लोहगडास किल्ल्यांचे स्वराज्यात महत्त्वाचे स्थान होते. पुणे - मुंबई एक्स्प्रेस हायवेलगतच असल्याने शिवभक्त व दुर्गप्रेमींसह पर्यटकांचाही या किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात राबता असतो.
3/8
या गडांवर भक्कम तटबंदीसह, दरवाजे व इतरही वास्तूंचे अवशेष आढळतात. गडावरील पाण्याची टाकी गडाच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात.
4/8
यांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून स्थानिक दुर्गप्रेमी संस्थांसह नक्कीच या गडांवर काम करू.
5/8
महाराष्ट्राचा हा उज्ज्वल ऐतिहासिक ठेवा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी आधी आपण तो पाहिला पाहिजे, अनुभवायला पाहिजे, त्याच्या उन्नतीसाठी आपणच कष्ट घेतले पाहिजेत.
6/8
आजपर्यंत मी अनेक गडकोट पाहिले आहेत. गडकिल्ल्यांची भ्रमंती करण्यासाठी माझे मन व शरीर कधीच थकत नाही. या गडकोटांच्या जतन संवर्धनासाठी देखील मी झटतो आहे. माझ्या या प्रयत्नांना तमाम शिवभक्त व दुर्गप्रेमींची भक्कम साथ मिळते आहे, याचा मला आनंद आहे.
7/8

8/8
या संपूर्ण भेटीत विश्वास दौंडकर, रोहीत जंगम, प्रसाद चाकणकर, अनिकेत आंबेकर व चेतन जोशी या विसापूर व लोहगड किल्ल्यांवर काम करणाऱ्या दुर्गसेवकांसह गडपायथ्याच्या पाटण गावचे सरपंच विजय तिकोने व त्यांचे सहकारी माझ्यासोबत होते.