एक्स्प्लोर
Ajit Pawar : आता एकच इच्छा, दादा मुख्यमंत्री व्हा; पुण्यात बॅनरबाजी
आता एकच इच्छा, दादा मुख्यमंत्री व्हा, या आशयाचे पुण्यात बॅनर लावण्यात आले आहेत.
Maharashtra NCP Political Crisis | Ajit Pawar
1/7

पिंपरी-चिंचवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे अजित दादा तुम्ही लवकर मुख्यमंत्री व्हा, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे
2/7

त्यासोबतच पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर उर्से टोलनाक्यावर 15/250 फुटाचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये दादांचीच हवा असल्याचं दिसत आहे.
3/7

अजित पवार यांनी बंड करुन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं अनेक नेत्यांना वाटत आहे. अनेक नेत्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली आहे.
4/7

त्यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे बॅनर लावण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगू लागली आहे.
5/7

बंड करण्यापूर्वी अनेकदा अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. अनेक कार्यक्रमात त्यांनी यासंदर्भात वक्तव्य देखील केली होती. त्यावेळी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा राज्यभर झाली होती.
6/7

मात्र बंडानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यासोबतच राज्याचं अर्थमंत्री पद देण्यात आलं आहे.
7/7

अर्थमंत्रीपद मिळाल्यावर लवकर अजित पवार तुम्ही मुख्यमंत्री व्हा, अशा आशयाचे मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
Published at : 15 Jul 2023 01:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















