एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update : पुणेकर गारठले, तापमान 10 अंशांच्या खाली, पुढील तीन दिवसांत कहर होणार, हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Weather Update : पुणे शहराचं तापमान सरासरी 9.8 अंशावर आलं आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल पुण्यात 9.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

पुणे: शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात (Weather Update) मोठी घट होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात (cold wave) कमी-जास्त होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठला आहे. पुणे शहराचं तापमान सरासरी 9.8 अंशावर आलं आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल पुण्यात 9.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.  (cold wave) 

Pune Weather Update : तापमानाचा पारा आणखी घटण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला

पुणे शहरात पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक आहे तर दिवसा सूर्यप्रकाश असला तरी हवेमध्ये गारवा टिकून असल्याने थंडीची जाणीव करून देणारी हुडहुडी दिसून येत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात किमान तापमानात रविवारीपासून (दि. १६) मोठ्या प्रमाणात घट होण्यास सुरूवात झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात बोचरी थंडी जाणवत आहे. पुण्यातही गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांगलीच थंडी जाणवू लागली आहे. थंडीमुळे रात्री ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठल्याने पुणेकरांना हुडहुडी भरायला सुरूवात झाली आहे. पुणे शहराचं तापमान सरासरी 9.8 अंशावर आलं आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल पुण्यात 9.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तापमानाचा पारा आणखी घटण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शिवाजी नगर- 10.8
पाषाण-9.8
लोहगाव-15.3
 चिंचवड-16.3
मगरपट्टा-16

Nashik Weather Update : नाशिक जिल्ह्यातील निफाडचा पारा घसरला

नाशिक जिल्ह्यातील निफाडचा पारा घसरला. गेल्या 24 तासात 2 या अशांनी पारा खाली आला असून या मोसमातील 6.9 अंश सेल्सिअस एवढ्या निचाकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काल 8. 3 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात आली होती त्यात आज घट झाली असून जागोजागी शेकोटी पेटवून थंडी पासून संरक्षण केले जात आहे.

Bhandara Weather Update : भंडाऱ्याला हवामान विभागाचा थंडीचा येलो अलर्ट

उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्यानं संपूर्ण महाराष्ट्रसह भंडारा जिल्ह्यातही हुळहुळी भरणाऱ्या थंडीनं भंडारा जिल्हा गारठला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून काही ठिकाणी पारा दहा अशांच्याही खाली घसरला आहे. पुढच्या काही दिवसांत मध्य भारतात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज असून महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांसह भंडारा जिल्ह्याला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. भंडारा जिल्ह्यात मागील काही दिवसात थंडीचा जोर वाढल्याचं जाणवू लागलं आहे. वाढत्या थंडीमुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्याचाही तापमान 10 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं या हुडहुडी भरणाऱ्या थंडीतही भंडाराकर अगदी सकाळपासूनच मॉर्निंग वॉकला निघत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. आहिल्यानगर, जळगाव, नाशिक, यवतमाळ, पुणे, मालेगाव, महाबळेश्वर, भंडारा, अमरातवी, नागपूर, वाशिम, गोदिंया येथील पारा 11अंशांपेक्षाही खाली गेला.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Embed widget