एक्स्प्लोर
PM Modi on Pahalgam Attack: पाकिस्तानच्या पापांचा घडा भरला! पंतप्रधान मोदींची दहशतवाद्यांच्या काळजात धडकी भरवणारी भाषा
PM Modi on Pahalgam Attack: दहशतवाद्यांना कल्पनेपलिकडची शिक्षा देणार, आता जमिनीत गाडण्याची वेळ आलीय; नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा. पंतप्रधान मोदींचा आक्रमक पवित्रा
Pahalgam terror attack PM Modi
1/9

पंतप्रधान मोदी शुक्रवारी बिहारमधील एका सभेतील भाषणात पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी भाष्य केले.
2/9

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश दु:खी आहे. पीडितांच्या दु:खात संपूर्ण देश सहभागी आहे. हल्ल्यातील जखमींवर उपचार सुरु असून त्यांना बरं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे मोदींनी सांगितले.
3/9

या दहशतवादी हल्ल्यात कोणी आपला मुलगा, कोणी नवरा, तर कोणी भाऊ गमावलाय. या सगळ्यांच्या मृत्युमुळे काश्मीर ते कन्याकुमारीपासून एकसारखी भावना आहे, असे मोदींनी म्हटले.
4/9

या दहशतवादी हल्ल्यात कोणी आपला मुलगा, कोणी नवरा, तर कोणी भाऊ गमावलाय. या सगळ्यांच्या मृत्युमुळे काश्मीर ते कन्याकुमारीपासून एकसारखी भावना आहे.
5/9

हा हल्ला निष्पाप पर्यटकांवर झालेला नाही. देशाच्या शत्रुंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला केला आहे, असे मोदींनी म्हटले आहे.
6/9

ज्यांनी हा दहशतवादी हल्ला केलाय त्यांना आणि यामागील सूत्रधारांना त्यांनी कधीही विचार केला नसेल त्यापेक्षा मोठी शिक्षा मिळेल.
7/9

दहशतवाद्यांच्या उरली-सुरली जमीन नष्ट करण्याची वेळ आली आहे, असे गर्भित इशारा देणारे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले.
8/9

140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या आकाचे कंबरडे मोडून राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
9/9

भारत दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना शोधून काढेल आणि शिक्षा देईल.
Published at : 24 Apr 2025 01:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























