पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या NIIO (नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन) 'स्वावलंबन' कार्यक्रमात भाग घेतला.
2/6
यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, 21 व्या शतकातील भारतासाठी सैन्यातील आत्मनिर्भरतेचे ध्येय खूप महत्त्वाचे आहे. स्वावलंबी नौदलासाठी पहिले स्वावलंबी चर्चासत्र आयोजित करणे, हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
3/6
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्याकडे प्रतिभा आहे. जगाकडे असलेली 10 शस्त्रे घेऊन आपल्या सैनिकांना मैदानात उतरण्यात काही अर्थ नाही, मी हा धोका पत्करू शकत नाही. माझ्या जवानाकडे ते शस्त्र असेल, ज्याचा विरोधक विचारही करणार नाही. मोदी म्हणाले की, भारत जागतिक स्तरावर स्वत:ला प्रस्थापित करत असताना अपप्रचाराच्या माध्यमातून देशावर हल्ले होत आहेत.
4/6
भारतीय नौदलाच्या स्वावलंबन नावाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रीय संरक्षण आता केवळ सीमापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते अधिक व्यापक झाले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने याबाबत जागरूक होणेही तितकेच गरजेचे आहे.
5/6
पंतप्रधान मोदींच्या म्हणण्यानुसार, आता राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. युद्धाच्या पद्धतीही बदलत आहेत. पूर्वी आपण फक्त जमीन, पाणी आणि आकाशापर्यंतच आपल्या संरक्षणाची कल्पना करायचो. पण आता व्याप्ती अवकाशाकडे, सायबर-स्पेसकडे, आर्थिक, सामाजिक अवकाशाकडे सरकत आहे.
6/6
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतावर अपप्रचाराद्वारे सतत हल्ले होत आहेत. अशा स्थितीत स्वत:वर विश्वास ठेवून भारताच्या हितसंबंधांना हानी पोहोचवणाऱ्या शक्तींना देश असो वा परदेशात, त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडावे लागणार.