शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत 'झुकेंगे नही', असं ईडीच्या कारवाईवर म्हटलं आहे.
2/6
ते म्हणाले आहेत की, 'तुम्ही त्या व्यक्तीला घाबरू शकत नाही, जो कधीही हार मानत नाही. झुकेंगे नही, असं ते म्हणाले आहेत.
3/6
राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''शिवसेनेला त्रास देण्यासाठी महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सर्व सुरु आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचा. मी लढणार, आम्ही लढू. महाराष्ट्र इतका कमजोर नाही आणि शिवसेनाही इतकी कमजोर नाही. खरी शिवसेना काय आहे, हे आज तुम्ही पाहत आहे.''
4/6
मरेन पण संजय राऊत झुकणार नाही आणि पक्षही सोडणार नाही, असं ही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटालाही लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे.''
5/6
राऊत म्हणाले आहेत की, ''सर्वाना नाहीत आहे माझ्याविरोधात खोटं प्रकरण लावण्यात आलं आहे. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मी शिवसेना सोडणार नाही आणि महाराष्ट्राशी बेईमानी करणार नाही.'' ते म्हणाले, ''ईडी मला अटक करणार आहे. मी अटक करून घेणार आहे.''
6/6
दरम्यान, संजय राऊत यांना ईडीने आता फक्त ताब्यात घेतलं आहे. त्यांना पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. ईडी कार्यालयात त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार असून काही तासात ईडी त्यांना अटक करणार का? हे स्पष्ट होणार आहे.