एक्स्प्लोर
1800 किलो तांदूळ अन् 2200 किलोंचं इतर साहित्य; असा तयार झाला प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा दहा हजार किलोंचा मसाले भात!
विष्णू मनोहर यांनी पाच हजार किलोचा मसालेभात तयार केला होता. शिवाय 25 हजार किलो चिवडा, 3 टन वांग्याचं भरीत इत्यादी पदार्थ तयार करण्याचाही विक्रम त्यांनी केला आहे.

Vishnu Manohar
1/9

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी दहा हजार किलो मसाले भात तयार केला आहे.
2/9

25 हजार आदिवासी बांधवांसाठी हा मसाले भात करण्यात आला.
3/9

बजाज नगरातील 'विष्णू जी की रसोई' इथे एका मोठ्या कढईमध्ये मसाले भात तयार करण्याची प्रक्रिया काल रात्री दहाच्या सुमारास सुरू करण्यात आली होती.
4/9

आज सकाळी सात वाजता हा मसालेभात तयार झाला. विष्णू की रसोई, वनवासी कल्याण आश्रम, मैत्री परिवारानं हा संयुक्त उपक्रम राबवलाय.
5/9

मसाले भात तयार करण्यासाठी 1800 किलो तांदूळ, 500 किलो बटाटे, 300 किलो तेल, 100 किलो मिरची, तीनशे किलो मटर, पाचशे किलो बटाटे, पाचशे किलो कांदे इत्यादी साहित्याचा उपयोग करण्यात आला आहे.
6/9

महत्त्वाची बाब म्हणजे, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल दहा हजार किलो मसाले भात तयार केला आहे.
7/9

बजाज नगरातील विष्णू जी की रसोई येथे एका मोठ्या कढईमध्ये मसाले भात तयार करण्याची प्रक्रिया काल रात्री 10 च्या सुमारास सुरू केली होती. आज सकाळी सात वाजता हा मसालेभात तयार झाला.
8/9

आज नागपुरात आदिवासी समाजाचा एक महामेळावा होत आहे. त्या महामेळाव्यात नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या संख्येनं आले आहेत. त्या ठिकाणी या मसाले भाताचं वितरण केलं जाणार आहे.
9/9

याआधीही विष्णू मनोहर यांनी पाच हजार किलोचा मसालेभात तयार केला होता. शिवाय 25 हजार किलो चिवडा, 3 टन वांग्याचं भरीत इत्यादी पदार्थ तयार करण्याचाही विक्रम त्यांनी केला आहे.
Published at : 21 Nov 2023 03:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
