एक्स्प्लोर
Ganesh Jayanti 2023: नागपुरात बाप्पासाठी 1100 किलोंचा बुंदीचा लाडू ; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
Ganesh Tekdi Mandir: नागपूरचे ग्रामदैवत म्हणून टेकडी गणपतीची ओळख आहे. आज, माघ चतुर्थीनिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. 1100 किलोचा महाकाय बुंदीडा लाडू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नागपुरातील टेकडी मंंदिरात 1100 किलोांचा महाकाय लाडू गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आला.
1/11

नागपूरचे ग्रामदैवत म्हणून टेकडी गणपतीची ओळख आहे. नागपुरातून नव्हे तर मध्य भारतातून मोठ्या संख्येत भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.
2/11

माघी चतुर्थीनिमित्त निमित्त श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे श्री गणेश टेकडी मंदिरात 1100 किलोंचा बुंदीचा महाकाय लाडू अर्पण करण्यात आला.
3/11

1100 किलोच्या या महाकाय लाडूसाठी शंभर किलोपेक्षा जास्त ड्रायफ्रूट वापरले आहेत.
4/11

मंदिराच्या हवन कुंड असलेल्या ठिकाणी सुंदर रांगोळीही काढण्यात आली आहे.
5/11

यापूर्वीही अनेक संस्थांकडून महाकाय लाडूचे प्रसाद लाडक्या बाप्पाला अर्पण करण्यात आले आहे.
6/11

चतुर्थीनिमित्त काल मंगळवारपासूनच टेकडी गणेश मंदिरात भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे.
7/11

या महाकाय लाडूचा प्रसाद भाविकांना वितरीत करण्यात येत आहे.
8/11

चतुर्थीनिमित्त टेकडी गणेश मंदिराला आकर्षक सजावटही करण्यात आली आहे.
9/11

आयोजित हवनमध्ये अनेक भाविक सहभागी झाले आहेत.
10/11

आज, बुधवारी माघी चतुर्थीनिमित्त टेकडी गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल आहे. चतुर्थीनिमित्त काल मंगळवारपासूनच टेकडी गणेश मंदिरात भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे.
11/11

आज सकाळपासून मंदिरात येणाऱ्यांची मोठी गर्दी बघायला मिळत असून मंदिर प्रशासनाच्यावतीने गर्दीवर नियंत्रणासाठी नियोजन करण्यात आले आहे.
Published at : 25 Jan 2023 06:17 PM (IST)
आणखी पाहा























