एक्स्प्लोर
Traffic Rules : ट्राफीक हवालदाराला कोणता दंड ठोठावण्याचा अधिकार? वाहतुकीचे 'हे' नियम जाणून घ्या
Traffic Rules : ट्राफीक हवालदाराला कोणता दंड ठोठावण्याचा अधिकार आणि अधिकाऱ्यांना कोणता अधिकार आहे. वाहतुकीचे नियम सविस्तर जाणून घ्या.
Traffic Rules | Challan
1/10

काही वेळा घाईमुळे आपल्याकडून काही वाहतूक नियम मोडले जातात. अशा वेळी वाहतूक पोलिसांकडून चालान कापलं जातं. पण याचे काही नियम असून ते जामून घेणं महत्त्वाचं आहे.
2/10

वाहतुकीचे नियम जाणून घेतल्यास तुम्ही तुमच्यासोबत होणारा गैरप्रकार थांबवू शकता.
3/10

तुम्हाला दंड ठोठावण्यासाठी, वाहतूक पोलिसांकडे दंड पावती पुस्तक किंवा ई-चलान मशीन असणं आवश्यक आहे. या दोनपैकी एक असल्याशिवाय, तुमचे चलन कापलं जाऊ शकत नाही.
4/10

वाहतुकीसंदर्भातील नियम मोडल्यावर दंड ठोठावताना वाहतूक पोलीस गणवेशात असणं बंधनकारक आहे. वाहतूक पोलिसाच्या गणवेशावर त्याचा बॅच नंबर आणि त्यांचं नाव असणं गरजेचं आहे.
5/10

जर वाहतूक पोलिसांकडे गणवेश नसेल तर तुम्ही वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला त्यांचे ओळखपत्र दाखवण्यास सांगू शकता.
6/10

ट्रॅफिक पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबलला तुमच्याकडून केवळ 100 रुपयांचा दंड वसूल करण्याचा अधिकार आहे.
7/10

याहून अधिक दंड फक्त वाहतूक अधिकारी (ASI किंवा SI) कापून घेऊ शकतात. या अधिकाऱ्यांना 100 रुपयांपेक्षा जास्त रकमेचं चलन कापण्याचा अधिक आहे.
8/10

एएसआय, एसआय आणि इन्स्पेक्टर यांना दंड लावण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मदतीला ट्रॅफिक कॉन्स्टेबल असतात.
9/10

ट्रॅफिक हवालदारला तुमच्या गाडीची चावी काढण्याचा किंवा गाडीच्या टायरमधील हवा काढण्याचा अधिकार नाही. ते तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलूही शकत नाहीत.
10/10

जेव्हा ट्रॅफिक कॉन्स्टेबल तुमच्या वाहनाची चावी काढतो तेव्हा तुम्ही त्या घटनेचा व्हिडीओ बनवू शकता. हा व्हिडीओ तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर दाखवू शकता आणि त्यांची तक्रार करू शकता.
Published at : 06 Jul 2023 01:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
