एक्स्प्लोर
PHOTO : गद्दार सदा सरवणकर, आक्रमक शिवसैनिकांनी फोटोला काळं फासलं
Sada Sarvankar Banner
1/7

शिवसेनेत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
2/7

दादर-माहिम मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर यांचा गद्दार असा उल्लेख करत शिवसैनिकांनी त्यांच्या बॅनरला काळं फासलं.
3/7

शिवसेनेची माहिममधील शाखा क्रमांक 188 बाहेर मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी सदा सरवणकर यांच्या फोटोला काळं फासून गद्दार असा उल्लेख केला.
4/7

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केला. त्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे.
5/7

शिवसेनेचे आणखी सात आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यापैकी सदा सरवणकर यांच्यासह काही आमदार आज गुवाहाटीत दाखल झाले आहेत.
6/7

सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत.
7/7

मुंबईतील शिवसेना आमदार कट्टर असून ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाहीत असा विश्वास होता. परंतु मुंबईतील तीन आमदार आज गुवाहाटीमध्ये पोहोचले आणि या विश्वासाला तडा गेला.
Published at : 23 Jun 2022 01:44 PM (IST)
आणखी पाहा























