एक्स्प्लोर

Mumbai Rain : ... अन् मोठा अनर्थ टळला; मुसळधार पावसात पर्यटनाचा अतिउत्साह पर्यटकांना भोवला!

Mumbai Rain Update

1/11
मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसनं धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या.

2/11
मुसळधार पावसात गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं स्वतः मुख्यमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणांकडूनही सातत्यानं आवाहन केलं जात होतं. पण अशातच काही नागरिकांना त्यांचा अतिउत्साहीपणा चांगलाच भोवला.

3/11
नागरिकांच्या याच बेफिकीरपणामुळे नवी मुंबईतील काही नागरीक अनेक तास पावसात अडकून पडले होते. नवी मुंबईच्या सीबीडी भागात असलेल्या एका डोंगरातून काल तब्बल 350 जणांची अग्निशमन दलानं सुटका केली आहे.

4/11
काल रविवारच्या दिवशी काही नागरीक लहान मुलांसह फिरण्यासाठी गेले होते. मात्र मुसळधार पावसानं ओढ्याचं पाणी वाढलं, अन् या पाण्याचा वेग इतका भयंकर होता की, नागरिकांचा परतीचा मार्गच बंद झाला. अखेर या नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली.

5/11
अग्निशमन दलानं या ओढ्यात मानवी साखळी करून तब्बल 350 जणांची सुखरुप सुटका केली आहे. यामध्ये अनेक लहान मुलंही होती. त्यामुळे नागरिकांनो पावसाळा आहे, नसतं धाडस करून धोका ओढवून घेऊ नका, असं आवाहन एबीपी माझाही करत आहे.

6/11
सीबीडीपाठोपाठ डोंबिवलीतील शीळफाटा येथेही काही नागरिकांचा अतिउत्साह पाहायला मिळाला. नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळं दुषणांचा धनी ठरणारा मार्ग म्हणजे, डोंबिवलीकडे जाणारा शिळफाटा.

7/11
या शिळफाट्यावर काल वाहनांचं नव्हे तर जनतेचं ट्रॅफिक जाम पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळं शिळफाटा मार्गाची काय अवस्था झाली होती हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

8/11
दरम्यान पावसाच्या प्रवाहातून वाचण्यासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली होती. पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातून जीव मुठीत धरुन वाट काढावी लागत होती. शिळफाटा परिसरातल्या जवळपास सगळ्याच दुकानात पाणी शिरलं होतं.

9/11
मुसळधार पावसामुळं काल मुंबईत मृत्यूतांडव पाहायला मिळालं. दरड आणि भिंत कोसळण्याच्या वेगवेगळ्या दुर्घटनेत 30 जणांना जीव गमवावा लागला. पावसाचं हे रौद्र रुप पाहुन मुंबईसह लगतच्या शहरांची  झोप उडाली असतानाच, आजही मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

10/11
आज  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर 19 ते 22 जुलै या कालावधीसाठी मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

11/11
सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आणि परभणीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव

जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन

पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो

Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget