एक्स्प्लोर
Dattatray Ware: वारे गुरूजींनी केला जालिंदरनगरच्या शाळेचाही कायापालट, पाहा फोटो
Dattatray Ware Guruji News: आंबेगाव तालुक्यातील आदिवासीबहूल मोडक्या तोडक्या स्थितीत असलेल्या शाळेचा वारे गुरूजींनी कायापालय केला आहे.

Dattatray Ware Guruji News
1/9

राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झालेलं असतानाच काही लोक मात्र ध्यानस्थ वृत्तीनं आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतायत. पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी गावातील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे हे त्यापैकीच एक.
2/9

चारही बाजूंना पसरलेलं माळरान आणि मधोमध असलेली ही शाळा. वाईटातून काहीतरी चांगलं होतं असं म्हटलं जातं. या सुंदर शाळेची उभारणी अशा वाईट प्रसंगातूनच झालीय.
3/9

वाबळेवाडीची सुंदर शाळा उभारणाऱ्या वारे गुरुजींवर गावच्या राजकारणातून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. जिल्हा परिषदेतून त्यांचं निलंबन घडवून आणण्यात आलं.
4/9

मात्र वारे गुरुजींवरील आरोपांमध्ये तथ्य नसल्यानं जिल्हा परिषदेला निलंबन मागे घ्यावं लागलं. गुरुजींची आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बदली करण्यात आली.
5/9

दोन गळक्या खोल्या, अवघे सात ते आठ विद्यार्थी... वारे गुरुजी मागील वर्षी जेव्हा इथं आले तेव्हा जालिंदर नगरच्या या शाळेची ही अशी अवस्था होती.
6/9

वारे गुरुजींनी गावकऱ्यांना साद घातली. जालिंदर नगरचे गावकरी सरसावले, काही दानशूर उद्योजक पुढे आले आणि जालिंदर नगरच्या या शाळेचा कायापालट झाला.
7/9

वाबळेवाडीसारखीच सुंदर आणि चकचकीत शाळा उभी राहिली आणि विद्यार्थ्यांची संख्या आठवरून थेट शंभरच्या पुढं गेली.
8/9

पण ही शाळा नुसती चकचकीत नाही तर अभिनव देखील आहे. या शाळेत न खोली आहे न बेंच आहेत, न फळा आहे न वह्या पुस्तकं. सगळं काही हसत - खेळत शिकवायचं असा वारे गुरुजींचा आग्रह.
9/9

चौथीच्या पुढं इयत्ता वाढवून मिळाव्यात यासाठी वारे गुरुजींचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. निदान यावेळी तरी राजकारण्यांनी अडथळे घालू नयेत म्हणजे मिळवलं.
Published at : 13 Jul 2023 10:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
