एक्स्प्लोर
विद्यार्थ्यांना खूशखबर! आता शाळा कॉलेजमध्येच मिळणार एसटीचा पास, परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांच्या सूचना
राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो. आता शालेय पास काढणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शाळांमधूनच पास वितरीत केले जाणार आहेत.
ST bus
1/7

शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत.
2/7

तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.
3/7

मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा 16 जुन पासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66.66% इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ 33.33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो.
4/7

त्याचप्रमाणे शासनाच्या " पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर " योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.
5/7

यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत.
6/7

आता विद्यार्थ्यांना पास साठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.
7/7

शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्या कडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत.
Published at : 15 Jun 2025 11:36 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















