एक्स्प्लोर
Rain Update: पुढील 5 दिवस राज्यातील 'या' भागांत मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या विभागातील स्थिती
Maharashtra Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. अशातच आता पुढील आणखी 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert
1/7

पुढील 5 दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे.
2/7

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.
3/7

पुढील 5 दिवस मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
4/7

विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
5/7

पुण्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
6/7

पुण्यासोबतच पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
7/7

मुंबई आणि ठाण्यातही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Published at : 24 Jul 2023 11:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion