एक्स्प्लोर
सावधान! उष्णतेची लाट, काही जिल्ह्यांना पावसाची शक्यता, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस तापमानाचा उद्रेक, Photos
तापमानाचा उद्रेक वाढत असताना काही जिल्हे वगळता उर्वरित भागात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसात प्रचंड तापमानाच्या झळा बसणार आहेत.
Weather Update
1/7

राज्यभरात तापमानाचा चटका असह्य झालाय. विदर्भात तर दुपारच्या भर उन्हात घराबाहेर पडणं भीतीदायक वाटणारं आहे.
2/7

बहुतांश ठिकाणी तापमानाचा उच्चांक दिसत असून विदर्भात 21 ते 23 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
3/7

अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
4/7

मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी तापमान उष्ण आणि दमट राहणार असून रविवारी संध्याकाळी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
5/7

सिंधुदुर्गात आज काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे.रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा 40 अंश डिग्री सेल्सिअसच्या वर गेलाय.
6/7

वाढत्या उष्णतेत महाराष्ट्रातले नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेत दिलासा मिळण्यासाठी नागरिकांची थंड पेयांना पसंती दिली जात आहे.
7/7

येत्या चार दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच नंतर विदर्भात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट आहे.
Published at : 20 Apr 2025 04:17 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग


















