एक्स्प्लोर
PHOTO : कोरोनानंतर बगाड यात्रा जल्लोषात; भाविकांचा उत्साह

Maharashtra Satara Bagad Yatra
1/9

महाराष्ट्रातलं सर्वात मोठं बगाड म्हणून ओळख असलेल्या बावधन गावची बगाड यात्रा आज कोरोना निर्बंधमुक्त उत्साहात साजरी झाली.
2/9

सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावं. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि याच गावाची यात्रा म्हणजे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी समजली जाणारी यात्रा.
3/9

हजारो भाविकांची गर्दी, आसमंतात गुलालाची उधळण आणि उंचच उंच बगाड, दोन वर्षांनी हे दृश्य पुन्हा एकदा दिसलं
4/9

सुमारे चार लाखांपेक्षा जास्त लोकं या यात्रेत सहभागी होतात आणि या बगाडातील एक खास वैशिष्ट्य मानलं जातं म्हणजे, या बगाडाला जुंपली जाणारी शेकडो धष्ट पुष्ट खिलार जातींची बैलं
5/9

कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा साताऱ्यातल्या बावधनमध्ये काशीनाथाच्या नावानं चांगभलं असा जयघोष झाला
6/9

यावेळी शेलारवाडीच्या बाळासाहेब मांढरेंना बगाड्याचा मान मिळाला
7/9

लेझिम, ढोल ताशांच्या गजरात बावधन दणाणून गेलं
8/9

बावधनची जत्रा म्हणजे देव भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचा विवाह सोहळा
9/9

आज ही यात्रा मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे
Published at : 22 Mar 2022 02:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
