एक्स्प्लोर
Rain: हवामान विभागानं वर्तवला मान्सूनच्या परतीचा अंदाज
भारतीय हवामान विभागानं (IMD) पाच किंवा आठ ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
Maharashtra Rain
1/9

पाच किंवा आठ ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिलीआहे.
2/9

राज्यात दुष्काळाची (Drought) चाहूल लागली आहे. कारण बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं माना टाकू लागली आहेत.
3/9

पावसाची गरज असतानाच परतीच्या हवामान खात्यानं मॉन्सूनच्या परतीच्या तारखांचा अंदाज वर्तवला आहे.
4/9

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकण विभाग वगळता अन्य सर्व ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही.
5/9

ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे.
6/9

सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण तिथं सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे.
7/9

राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
8/9

राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली मोठी तूट निर्माण झाली आहे. सरासरीच्या उणे 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे.
9/9

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील पाणी पातळी देखील घटली आहे. विहरी आणि बोअरवेलचे पाणी आटले असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
Published at : 29 Aug 2023 12:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion