एक्स्प्लोर
Chandrayaan-3 : मानवी साखळी...प्रार्थनेपासून ते अंतराळ विषयक कार्यशाळा...राज्यभरात चांद्रयान मोहिमेचा उत्साह; पाहा फोटो
Chandrayaan 3 Landing : चांद्रयान मोहिमेच्या यशासाठी शुभेच्छा देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणारी कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली.
Chandrayaan-3 : मानवी साखळी...प्रार्थनेपासून ते कार्यशाळा...राज्यभरात चांद्रयान मोहिमेचा उत्साह
1/9
![परभणीच्या गंगाखेड येथे पुजा-प्रार्थना करण्यात आली. येथील सुप्रसिद्ध कलाकार विश्वनाथ कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
परभणीच्या गंगाखेड येथे पुजा-प्रार्थना करण्यात आली. येथील सुप्रसिद्ध कलाकार विश्वनाथ कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
2/9
!['चांद्रयान-3' चे प्रक्षेपण झाले त्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले होते.आजच्याही चंद्रयानाचा उतरण्याचा लाईव्ह आनंद विद्यार्थी घेणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/e57ff72ab83fe3f745e3dbff433781ee388b9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'चांद्रयान-3' चे प्रक्षेपण झाले त्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले होते.आजच्याही चंद्रयानाचा उतरण्याचा लाईव्ह आनंद विद्यार्थी घेणार आहेत.
3/9
![शहरातील मुख्य चौकात चांद्रयानाची प्रतिकृती तयार करून त्याची पूजा करून सर्वांनी प्रार्थना केली..मोठ्या संख्येने गंगाखेडकर यावेळी उपस्थित होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शहरातील मुख्य चौकात चांद्रयानाची प्रतिकृती तयार करून त्याची पूजा करून सर्वांनी प्रार्थना केली..मोठ्या संख्येने गंगाखेडकर यावेळी उपस्थित होते.
4/9
![नाशिकच्या चांदवड येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटनातुन भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/5845b8fe81f97d6af71b1e77a269b21bda04f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या चांदवड येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटनातुन भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
5/9
![पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पालिकेच्या तारांगण केंद्रात विज्ञानाचे शिक्षक आणि विद्यार्थी स्वतः चांद्रयान तीन ची प्रतिकृती साकारत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पालिकेच्या तारांगण केंद्रात विज्ञानाचे शिक्षक आणि विद्यार्थी स्वतः चांद्रयान तीन ची प्रतिकृती साकारत आहेत.
6/9
![चंद्रावर इस्त्रो पाठविलेल्या 'चांद्रयान-3' चे पाऊल आज पडणार आहे. त्याचेच औचित्य साधून प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी चांद्रयान ३ सबंधित संदेश विद्यार्थ्यांसह छत्रीवर साकारले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चंद्रावर इस्त्रो पाठविलेल्या 'चांद्रयान-3' चे पाऊल आज पडणार आहे. त्याचेच औचित्य साधून प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी चांद्रयान ३ सबंधित संदेश विद्यार्थ्यांसह छत्रीवर साकारले.
7/9
![मुलुंडच्या सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही छत्री रंगविण्याची कार्यशाळा शाळेत घेण्यात आली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुलुंडच्या सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही छत्री रंगविण्याची कार्यशाळा शाळेत घेण्यात आली.
8/9
![या वेळी सुलेखनकार अच्युत पालव यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत छत्र्या रंगविण्याचा अनुभव घेताना मुले अगदी तल्लीन झाली होती. स्वत: तयार केलेल्या छत्रीचा 'आनंद मुलांच्या चेहयावर दिसून आला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या वेळी सुलेखनकार अच्युत पालव यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत छत्र्या रंगविण्याचा अनुभव घेताना मुले अगदी तल्लीन झाली होती. स्वत: तयार केलेल्या छत्रीचा 'आनंद मुलांच्या चेहयावर दिसून आला.
9/9
![चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी यवतमाळमध्ये भाजपच्या नेत्यांनी केदारेश्वर मंदिरात अभिषेक केला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी यवतमाळमध्ये भाजपच्या नेत्यांनी केदारेश्वर मंदिरात अभिषेक केला.
Published at : 23 Aug 2023 05:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)