एक्स्प्लोर
Rain : मुंबईसह कोकण वगळता राज्यात पावसाची शक्यता कमीच
मुंबईसह कोकण वगळता अन्य ठिकाणी जोरदार पावसासाठी पोषक वातावरण नाही अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
maharashtra Rain News
1/9

ध्या राज्यात पावसानं (Rain)दडी मारली आहे. पावसाअभावी खरीपाची पिकं (Kharif crops) वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
2/9

सध्याची कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Mainkrao Khule) यांनी दिली आहे.
3/9

पुढील संपूर्ण पंधरवाडा म्हणजे 7 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकण आणि काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यताच अधिक जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
4/9

मुंबईसह कोकणात जोरदार तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मध्यम पावसाची शक्यता मात्र कायम आहे.
5/9

सप्टेंबर 7 नंतरच्या पावसाची स्थिती त्यावेळीच वातावरणातील बदलावर अवलंबून असेल असे खुळे म्हणाले.
6/9

जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात एल-निनो सुप्तावस्थेत तर आयओडी तटस्थवस्थेत असतानाही समाधानकारक पाऊस झाला नाही.
7/9

सध्या एल निनोच्या प्रभावामुळं कमी पाऊस पडत आहे.
8/9

केवळ पावसावरच अवलंबून असणाऱ्या खरीप हंगामातील सध्याची जिरायती पिके माना टाकत आहेत.
9/9

पिकांना पाण्याची खूप गरज आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. काही ठिकाणी शेतकरी पिकांवर रोटवेटर मारण्याच्या मनस्थितीत आहेत.
Published at : 25 Aug 2023 02:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























