एक्स्प्लोर

Calligraphy : शीतलताराच्या अक्षरकलावारी मध्ये रंगणार जगभरचे नेटकरी, “सुलेखन फक्त कला नसून भक्ती आणि ध्यान आहे”

मूळची मुंबईकर असलेली शीतल सध्या अमेरिकेतील बोस्टनस्थित सुलेखनकार असून स्व-अध्ययनातून गेली १२ वर्षे सुलेखनाचे प्रयोग करीत आहे.

Why IS Calligraphy Important?

1/8
अक्षरकलावारी का महत्वाची ? अक्षरकलावारी ही एक वार्षिक कॅलिग्राफी सिरीज आहे. प्रत्येकवर्षी पंढरीच्या वारी सोबत दररोज एक या प्रमाणे शीतल २० संतांचे २० वेगळे अभंग आणि त्यासोबत विठ्ठलाचे नवे रूप रेखाटते.

2/8
आळंदी आणि देहूवरुन निघालेल्या पालखी आषाढी एकादशीला पंढरीत पोचतात. त्या दिवशी या उपक्रमाचीदेखील सांगता होते. अमेरिकेतील आणि भारतातील अनेक निवडक देवनागरी सुलेखनकार या उपक्रमात आमंत्रित असतात.

3/8
800 वर्षांपासून चालत आलेली पंढरीच्या वारीची परंपरा आणि त्याहून आधी अस्तित्वात आलेली देवनागरी लिपी या दोन्ही गोष्टींकडे जगाचे दुर्लक्ष झालेले आहे. महाराष्ट्राची आणि इथल्या संस्कृतीची ओळख हि स्वतंत्रपणे भारताबाहेर अगदी अपवाद म्हणून अस्तित्वात आहे. भारतातील सांस्कृतिक विविधतेमधील एक घटक देवाचीच मर्यादित ओळख आपल्याला पुरेशी नाही. कलेच्या एका माध्यमातून आपल्याबद्दलची माहिती जगभरात प्रवाहित व्हावी, संतसाहित्याची श्रीमंती सर्वांना दिसावी हा शीतलताराचा प्रयत्न आहे.

4/8
युरोपीय प्रबोधनाचा काळ किंवा रानिसां (Renaissance) च्या तोलामोलाची वारकरी संप्रदाय ही गोष्ट आहे. तत्कालीन धार्मिक चौकटीच्या बाहेर जाऊन अध्यात्म समजावून देणारी हि परंपरा कलेच्या मुख्य प्रवाहातून बाजूलाच राहिली. हि परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याच मातीतल्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. सर्वांना समकालीन कलेतून गणपतीची श्रीकृष्णाची कलात्मक रूपे माहिती झाली तशीच विठ्ठलाचीही माहिती व्हावी यासाठी शीतल आग्रही आहे.

5/8
शीतल म्हणते अमेरिकेतील चेरी ब्लॉसम महोत्सव, स्पेनचा टोमॅटीनो उत्सव, फ्रान्स मधील टूर डे फ्रान्स हे जर जगातील लोकप्रिय आणि आकर्षक महोत्सव असतील तर तेच महत्व पंढरीच्या वारीलाही मिळायला हवे. विठ्ठलाचे रूप फार गोजिरे आहे, कपाळीचा टिळा, कानातील मत्स्यकुंडले, कटीवर असलेले हात हे रूप रेखांकनाच्या दृष्टीने उत्कृष्ट आहे. या रूपाच्या कलात्मक शक्यता अमर्याद आहेत असं ती सांगते.

6/8
अक्षर अभंग :  विठ्ठलावर, अनेकानी असंख्य लिखाण केले आहे. साधारणपणे ५० संतांनी हजारो अभंग लिहिले आहेत. मात्र ५-६ संतांचे मोजकेच अभंग सर्वश्रुत आहेत, प्रसिद्ध आहेत. गायले गेलेले अभंगच मुख्यतः लोकप्रिय झाले, पण त्यातून प्रस्थापित जातीपातीमध्ये बांधल्या गेलेल्या आणि कर्मकांड आधारित अध्यात्म साधनेला मोठा छेद दिला गेला होता हे विसरून कसं चालेल ? अभंगांतून उपस्थित होणारे प्रश्न अस्वस्थ करतात आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतात हे फार महत्वाचे आहे.

7/8
अभंगांच्या माध्यमातून सांस्कृतिक बंडखोरी केली गेली आणि तो अमूर्त सांस्कृतिक वारसा आजही महाराष्ट्रातील विचारात आढळतो. त्याकाळी तयार झालेल्या ज्ञानाच्या शिदोरीबद्दल कुतुहूल जागृत असावे, चर्चा व्हावी आणि आकुंचन पावलेल्या अटेन्शन स्पॅन मध्ये थोडी जागा मिळावी, म्हणून शीतल दरवर्षी 20 वेगळे अभंग निवडते.

8/8
यावर्षी काय विशेष? गेल्यावर्षी अक्षरकलावारीला प्रचंड प्रतिसाद मिळाला, १७ लाख लोकांनी कलाकृती पाहिल्या, आषाढी एकादशीच्या  डिजिटल प्रदर्शनाला १० हजार लोकांनी भेट दिली. यावर्षीही काही वेगळे प्रयोग पाहायला मिळतील असे शीतल सांगते. चित्र आणि सुलेखन या दोन्ही गोष्टींचे फ्युजन हि यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील आणि देशातील सुलेखनकार सहभागी होत असल्याने विविधता असणार यात शंका नाही.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली

IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंगSanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
US Los Angeles Wildfires : आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
Narayan Rane on Uddhav Thackeray : 46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानी देवीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, वाजत गाजत हजारो महिलांनी केलं जलार्पण
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, डोक्यावर कळशी घेऊन हजारो महिला निघाल्या..
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!

Embed widget