एक्स्प्लोर
Kolhapur Shahi Dasara : कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न
Kolhapur Shahi Dasara : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात दिमाखात साजरा झाला. करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.
Kolhapur Shahi Dasara
1/12

छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात दिमाखात साजरा झाला.
2/12

शाहू महाराज छत्रपती व संभाजीराजे छत्रपती यांच्या सहकार्याने, दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरुपात अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.
3/12

दसरा सोहळ्यामध्ये श्री शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती व यशस्विनीराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.
4/12

करवीर निवासिनी अंबाबाई(श्री महालक्ष्मी), जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले.
5/12

शाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभाग व टी.ए. बटालियनच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले.
6/12

दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. शाही घराण्याच्या प्रथेप्रमाणे औक्षण करण्यात आले.
7/12

पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली.
8/12

यावेळी उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोने लुटले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना नागरिकांनी त्यांना सोने दिले.
9/12

सजवलेले उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
10/12

मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे चित्ररथ तसेच तालमींचे कुस्तीगीर सहभागी झाले होते.
11/12

नागरिकांना शाही दसरा महोत्सव सोहळा पाहता यावा यासाठी शहरात विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.
12/12

या सर्व कार्यक्रमांचे नियोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा नियोजन समिती सदस्य उदय गायकवाड, प्रमोद पाटील, प्राचार्य महादेव नरके, अजेय दळवी, आदित्य बेडेकर , ऋषिकेश केसकर, सुखदेव गिरी यांनी केले.
Published at : 05 Oct 2022 08:26 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
क्रीडा
























