एक्स्प्लोर
कोल्हापूर : देशाला भाजपमुक्त केले नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही; सतेज पाटलांचा घणाघात
Satej Patil : राजर्षी शाहूंच्या समतेच्या भूमीतून परिवर्तनाची लढाई सुरू होत आहे. हा संदेश पुढे राज्यात आणि देशात जाणार असल्याचेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
Satej Patil
1/10

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसची जनसंवाद यात्रा भर पावसात पार पडली.
2/10

पावसातून यात्रा पार पडल्यानंतर दसरा चौकात सभा झाली.
3/10

येत्या निवडणुकीत देशाला भाजपमुक्त केले नसल्यास पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असा घणाघात सतेज पाटील यांनी केला.
4/10

पुढील पिढीच्या भविष्यासाठी परिवर्तनाच्या लढाईला सज्ज होऊ या, असे आवाहन त्यांनी केले.
5/10

जिल्ह्यात काँग्रेसतर्फे तीस सप्टेंबरपासून जनसंवाद पदयात्रेला प्रारंभ झाला आहे.
6/10

भाजपकडून गेल्या नऊ वर्षांत द्नेषाचे राजकारण केले जात असल्याचे सतेज पाटील म्हणाले.
7/10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली घटनाच नव्हे तर देशाचा इतिहासच बदलला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
8/10

अमृत फक्त अदाणी आणि अंबानीसाठी आणि उर्वरित देशासाठी काळ आहे, हे आता लोकांच्या लक्षात आलं असल्याचा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.
9/10

बेरोजगारी, महागाई असो किंवा प्रत्येक प्रश्नाबाबत भाजपकडून लोकांची दिशाभूल होत असल्याचे आमदार ऋतुराज पाटील म्हणाले.
10/10

देशातील दडपशाहीच्या वातावरणात जनतेला विश्वास द्यावा लागणार असल्याचे आमदार जयश्री जाधव म्हणाल्या.
Published at : 10 Sep 2023 11:04 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























