एक्स्प्लोर
कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्पात
Ambabai Temple in Kolhapur: देवीचा पालखी सोहळा, नगर प्रदक्षिणा ललित पंचमीला होणारी टेंबलाई देवीची भेट आणि मंदिरातील धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
Ambabai Mandir
1/10

कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
2/10

भाविकांना देवीचे दर्शन अतिशय कमी वेळेत आणि चांगल्या पद्धतीने घेता यावं यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शन रांग तयार केली आहे.
3/10

ऊन किंवा पावसाचा कोणताही परिणाम होऊ नये अशा पद्धतीने मंडप उभारला आहे.
4/10

दरम्यान नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिरात रोज सरासरी तीन ते चार लाख भाविक येतात.
5/10

देवीचा पालखी सोहळा, नगर प्रदक्षिणा ललित पंचमीला होणारी टेंबलाई देवीची भेट आणि मंदिरातील धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
6/10

आता यावर नजर ठेवण्यासाठी यंदा पोलिसांकडून एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.
7/10

यासाठी दोन खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
8/10

या कंपन्यांची यंत्रणा मंदिरातील गर्दीवर नजर ठेवून दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांना सूचना देईल.
9/10

आपत्कालीन धोके दुर्घटना घडून येत यासाठी पूर्वसूचना मिळेल, त्यानुसार पोलिसांना काम करता येणार आहे.
10/10

शहरातील वाहनांची गर्दी कोंडी झालेले रस्ते पर्यायी मार्ग यांची माहिती या तंत्रज्ञानाद्वारे वाहतूक पोलिसांना मिळणार आहे.
Published at : 19 Sep 2025 11:05 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























