एक्स्प्लोर
Advertisement

Kolhapur Shahi Dasara : कोल्हापूर शाही दसरा फेस्टीवल स्ट्रीटला उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर महापालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या शाही दसरा फेस्टीवल स्ट्रीटला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या फेस्टीवल स्ट्रीटचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले.

Kolhapur Shahi Dasara
1/8

कोल्हापूर मनपाकडून आयोजित केलेल्या शाही दसरा फेस्टीवल स्ट्रीटला उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
2/8

या फेस्टीवल स्ट्रीटचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले.
3/8

शहरात यावर्षी भव्य स्वरुपात शाही दसरा महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
4/8

कोल्हापूर मनपाकडून महावीर कॉलेज ते स्टार बझार, खानविलकर पेट्रोलपंप या रस्त्याच्या दोन्ही बाजूस बचत गटाचे 110 स्टॉल व स्टेज उभा करण्यात आला आहे.
5/8

शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीटमध्ये बचत गटाच्या माध्यमातून विविध कलावस्तू व खाद्यपर्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत.
6/8

हे स्टॉल 5 ऑक्टोबर दुपारपर्यंत सुरु राहणार असून यामध्ये ग्रामीण व शहरी बचत गटांनी सहभाग घेऊन स्टॉल लावले आहेत.
7/8

याचबरोबर माध्यमिक शाळेतील मुलांचे लेझीम, झांजपथके, गरबा नृत्य, ड्राॅईंग, स्केच, टॅटू, रांगोळी, लाठीकाठी, झिम्मा फुगडी, मेहंदी, भोंडला, पारंपारिक खेळामध्ये गोटया खेळणे, टायर फिरवणे, विटी दांडू, कुस्ती, चुयीमुयी, गजगे असे खेळ खेळविण्यात आले.
8/8

तसेच नृत्य, गायन, वाद्यवादन, दांडिया, शाहू महाराजांची व इतर वेशभूषा, मनोरंजनाचे कार्यक्रमही घेण्यात आले.
Published at : 05 Oct 2022 02:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
