एक्स्प्लोर
Radhanagari Dam: राधानगरी धरणाचे अवघ्या सहा तासांच्या आत पाच स्वयंचलित दरवाजे उघडले; 8540 क्युसेक पाण्याचा विसर्ग
Radhanagari Dam : धरणातून मोठा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात धरणाचे दरवाजे उघडले होते. यावर्षी जुलै अखेरलाच उघडले आहेत.
Kolhapur Rain Update
1/12

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे.
2/12

आज (26 जुलै) राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत.
3/12

आतापर्यंत 5 ( 3, 4, 5, 6 व 7 ) स्वयंचलित दरवाजे उघडली आहेत.
4/12

धरणातून 8540 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
5/12

धरणातून मोठा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
6/12

धरणाचा क्रमांक सहा स्वयंचलित दरवाजा सकाळी सव्वा आठ वाजता उघडला.
7/12

सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी 5 वा स्वयंचलित दरवाजा उघडला.
8/12

दहा वाजून 3 मिनिटांनी 3 व दहा वाजून सहा मिनिटांनी 4 असे दरवाजे उघडले.
9/12

त्यानंतर दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सातव्या क्रमांकाचा दरवाजा उघडला
10/12

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात धरणाचे दरवाजे उघडले होते. यावर्षी जुलै अखेरलाच उघडले आहेत.
11/12

राधानगरी धरणातील पाणी कोल्हापुरात पोहोचण्यास 12 ते 15 तास लागतात.
12/12

त्यामुळे पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.
Published at : 26 Jul 2023 02:23 PM (IST)
आणखी पाहा






















