एक्स्प्लोर
Kolhapur News: थेट पाईपलाईनमुळे कोल्हापूरकरांची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल, काळ्ळमावाडीत धरणात सतेज पाटलांकडून जलपूजन
येत्या दोन महिन्यांत उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण होताच योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन कोल्हापूला कायमस्वरूपी स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार असल्याचे आमदर सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
Kolhapur News
1/10

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि कोल्हापूरचे दीर्घकाळ स्वप्न असेल्या थेट पाईपलाईन योजनेमधील मैलाचा टप्पा पार झाला आहे.
2/10

दमदार पावसामुळे काळम्मावाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या थेट पाईलपाईलन योजनेच्या जॅकवेलमध्ये पाणी पोहोचले आहे
3/10

काळम्मावाडी धरणातून पाणी जॅकवेलमध्ये पोहोचल्याने आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव यांनी मान्यवरांसह योजनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
4/10

कोल्हापूरला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्याचे माझे स्वप्न पूर्णत्वास येत असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
5/10

यावेळी योजनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर सतेज पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
6/10

येत्या दोन महिन्यांत उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण होताच योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन कोल्हापूला कायमस्वरूपी स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
7/10

योजनेच्या पूर्ततेमुळे आत्मिक समाधान लाभल्याचे त्यांनी म्हटले आहे.
8/10

दुसरीकडे, कोल्हापुरात पुईखडीपर्यंतची पाईपलाईन टाकून पूर्ण झाली आहे.
9/10

दुसऱ्या बाजूने वीजवाहिन्यांचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. तर जॅकवेलवरील पंप हाऊसचे काम पूर्णत्वाला जात आहे.
10/10

उपसा पंप जोडण्यासाठी तयारी सुरू आहे.
Published at : 09 Jul 2023 03:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















