एक्स्प्लोर
Shiv Jayanti : जय भवानी, जय शिवाजी! आग्र्यातील ऐतिहासिक शिवजयंतीची तयारी अंतिम टप्प्यात, पाहा फोटो
Agra Shiv Jayanti Celebration : यावर्षी आग्र्याच्या किल्ल्यात ऐतिहासिक शिवजयंती साजरी होणार आहे.
Agra Shiv Jayanti 2023
1/9

आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे.
2/9

'अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान'च्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच आग्रा किल्यातील दिवाण-ए-आममध्ये शिवजयंती साजरी केली जात आहे.
3/9

यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे.
4/9

आग्रा किल्यातील दिवाण-ए-आममधील तोफेजवळ हा कार्यक्रम होणार आहे.
5/9

कार्यक्रमास्थळी येणाऱ्या पाहुण्यांना बसण्यासाठी खुर्च्या लावण्यात आल्या आहेत.
6/9

तसेच मुख्य स्टेज देखील उभारण्यात येत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासोबतच साउंड सिस्टीम लावण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे.
7/9

विशेष म्हणजे आग्रा किल्ल्याच्या समोर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरात सजावट करण्यात आली आहे.
8/9

या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्यात दाखल झाले आहेत.
9/9

तसेच आग्रा जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी देखील या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे.
Published at : 19 Feb 2023 09:39 AM (IST)
आणखी पाहा























