एक्स्प्लोर
Ram Navami : रघुकुल रीति सदा चलि आई, प्राण जाई पर बचन न जाई... सियावर राम चंद्र की जय...
Ayodhya : रामाचं आयुष्य आपल्याला भविष्यासाठी पुरणार आहे आणि उरणारही आहे... म्हणूनच, प्रभू रामचंद्रांच्या विचारांची तत्व, सत्व आणि महत्त्व आपणही अंगीकारण्याचा संकल्प करू.
Ram Navami 2023
1/7

वसंत ऋतू जाऊन चैत्र येतो... आणि सृष्टी कूस बदलते अन् झाडा-झुडपांना नवी पालवी फुटते... भवतालाला हिरवाकंच रंग चढतो... अवघी धरती थरारून जाते... पाखरं-पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो... नद्यांचं पोट पाण्याच्या खळखळटाने आनंदून जातं... कानात मधूर गुंजारवर करत वारा बासरी बाजवू लागतो...अन् त्यातच कुठूनसा आवाज येऊ लागतो... दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला... राम जन्मला गं सखे, राम जन्मला... ज्याने अवघ्या जगावर मानवतेचं तोरण बांधलं आणि आदर्श अशा राज्यकारभाराचं धोरण बहाल केलं... ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम भूमंडळी अवतरले, त्याची ही दुही होती... दिपून जाय माय, स्वत: पुत्र दर्शने... ओघळले आसू, सुखे कंठ दाटे... एका बाजूला कौसल्याराणीची ही अवस्था तर, रयतेतून आपला तारणहार, राजा आल्याचा हर्षोल्हास... हाच आनंदसोहळा शरयू तीरावर कसा संपन्न झाला.
2/7

देवांचा देव असलेल्या विष्णूचा सातवा अवतार जन्माला आला आणि अयोध्येची माती आनंदून गेली... साताजन्माचं पुण्य अयोध्यानगरीच्या पदरी पडलं... घराघरांवर रत्न-तोरणे, अवती भवती रम्य उपवने... त्यात रंगती नृत्य गायने... अशी काहीशी अवस्था अयोध्यानगरीची झाली... शरयू नदीचं संथ पाणी देदिप्यमान चमक लेवून शहारून गेलं... त्या परुषोत्तम राजाची पावलं आपल्याही भाळी लागतील, या कल्पनेने शरयूतीर लोभस झाला... आणि मग चाहुल लागली... दीन-दुबळ्या जनतेच्या कल्याणाची... मानवतेच्या वाटचालीची... दया-माया- क्षमा आणि शांती या चतु:सूत्रीची... जिथं, रागाचा ना लवलेश आहे, ना लोभाची आस... ना द्वेशाचा ध्यास आणि नाही मत्सराची सावली... रामपर्व सुरू जाहले, ज्याची दिशा फक्त आणि फक्त एकच... राजसौख्य ते सौख्य जनांचे... एकच चिंतन लक्ष मनांचे.
Published at : 30 Mar 2023 09:18 PM (IST)
आणखी पाहा























