राजस्थानमधील अलवर येथे सरिस्काच्या जंगलात (Alwar Sariska Forest Fire) लागलेल्या भीषण आगीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
2/8
या आगीच्या भक्ष्यस्थानी मोठया प्रमाणात जनावरेही येत आहेत. आग सुमारे 20 किमी जंगलात पसरली असून लोकवस्तीच्या दिशेने सरकत आहे, त्यामुळे गावकरीही नाराज झाले आहेत.
3/8
या वनपरिक्षेत्रात सुमारे 27 वाघांव्यतिरिक्त सांबर, चितळ यांसह हजारो प्राणी वास्तव्य करतात. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही.
4/8
गेल्या दोन दिवसांपासून लष्कराचे जवान हेलिकॉप्टरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तापमानात वाढ झाल्याने आगीने भीषण रूप धारण केले आहे, त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले आहे.
5/8
आग जंगलात पसरल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. या दरम्यान, जंगलालगतच्या अनेक गावांनाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असून, त्याबाबत प्रशासनही सतर्क आहे.
6/8
मार्च महिना सुरू होताच अलवरचे तापमान 39 अंशांवर पोहोचले होते, मात्र जंगलाला लागलेल्या आगीनंतर सरिस्का येथील डोंगराळ भागामुळे तापमान 50 अंशांवर पोहोचले आहे.
7/8
आगीने भीषण रूप धारण केले असतानाच वाढत्या तापमानामुळे ग्रामस्थांच्या पिकांचेही नुकसान होत आहे. घटनास्थळी 300 हून अधिक अधिकारी, वन कर्मचारी, वाहनचालक, मार्गदर्शक उपस्थित असून, डोंगराळ भागामुळे आग आटोक्यात आणण्यात मोठी अडचण येत असल्याने सुमारे तीनशे अधिकारी, वन कर्मचारी आणि इतर नागरिक घटनास्थळी उपस्थित होते.
8/8
आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थही आग विझवण्यासाठी सहकार्य करत आहेत. (PC : ANI)