एक्स्प्लोर
US एअरपोर्टवर राहुल गांधींसोबत दिसलेली 'ती' कोण? व्हायरल फोटोनं चर्चांना उधाण, नेटकरी विचारतायत, 'राहुल, हूज दॅट गर्ल'
Rahul Gandhi Viral Photo: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर सध्या एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो राहुल गांधींचा आहे. या फोटोत राहुल गांधी एकटे नाहीत, तर त्यांच्यासोबत एक महिला दिसत आहे.

Rahul Gandhi Viral Photo
1/10

राहुल गांधींचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. राहुल गांधींसोबतची ती महिला नेमकी कोण? याचा शोध सर्वजण घेत आहेत.
2/10

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी जेव्हा अमेरिकेत पोहोचले, त्यावेळी यूएस एअरपोर्टवरचे त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले. एकंदरीत राहुल गांधींच्या युएस दौऱ्याच्या चर्चाही बऱ्याच रंगलेल्या.
3/10

दरम्यान, यूएस दौऱ्यातील राहुल गांधींचा एक फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यामध्ये राहुल गांधी एका महिलेसोबत दिसत होते. चला तर जाणून घेऊया, राहुल गांधी यांच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसणारी ती महिला नेमती कोण?
4/10

रायबरेली, उत्तर प्रदेश (यूपी) येथील लोकसभा खासदार राहुल गांधी रविवारी (10 सप्टेंबर, 2024) अमेरिकेतील डॅलस, टेक्सास येथे पोहोचले.
5/10

माजी काँग्रेस अध्यक्षांचे अमेरिकेतील भारतीय डायस्पोरा आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेस (IOC) सदस्यांनी जोरदार स्वागत केलं.
6/10

राहुल गांधींच्या यूएस दौऱ्यादरम्यान 9 सप्टेंबर 2024 रोजी त्यांचा एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये त्यांच्यासोबत एक महिला उभी होती.
7/10

राहुल गांधी फोटोमध्ये हिरव्या रंगाच्या टीशर्टमध्ये दिसत आहेत. तर, त्यांच्यासोबत असलेल्या महिलेनं ब्राऊन रंगाचा टॉप वेअर केला आहे.
8/10

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा फोटो काही वेळातच तुफान व्हायरल झाला. वेगानं व्हायरल होणाऱ्या या फोटोवर आलेल्या कमेंटमध्ये एकच प्रश्न विचारला गेला, फोटोमध्ये दिसत असलेली 'ती' महिला कोण?
9/10

'ब्लिट्ज'चे एडिटर सलाउद्दीन शोएब चौधरी (@salah_shoaib) यांनी ट्विटरवर राहुल गांधी यांचे दोन फोटो शेअर केलेत.
10/10

सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं, "तुम्ही मुर्ख आहात... फोटोमध्ये राहुल गांधींसोबत त्यांचे बालपणीचे मित्र अमिताभ दुबे आहेत. आणि त्यांच्यासोबत असलेली महिला अमिताभ दुबे यांची पत्नी अमूल्य आहे."
Published at : 10 Sep 2024 09:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
