एक्स्प्लोर
Train Rules: ट्रेन सुरू होऊन 10 मिनिटं झाली तरी सीटवर पोहोचला नाहीत तर तिकीट होणार रद्द? जाणून घ्या नवा नियम
Train Reservation: तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी रेल्वे तिकीट बुक केलं असेल आणि ती ट्रेन सुरु होऊन 10 मिनिटं झाली तरी तुम्ही सीटवर आला नाहीत, तर तुमचं तिकीट रद्द केलं जाऊ शकतं.

Train Reservation Rules
1/5

तुम्ही आता तुमच्या ट्रेनमधील आरक्षित सीटवर (Reserved Seat) उशिरा पोहोचलात तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. वास्तविक, आता टिकीट चेकर (TTE) तुमची उपस्थिती नोंदवण्यासाठी फक्त 10 मिनिटं वाट पाहणार आहे.
2/5

पूर्वी एक-दोन स्थानकांनंतर प्रवासी सीटपर्यंत पोहोचायचे, तेव्हाही टीटीई त्यांच्या उपस्थितीची खूण करत होते, पण आता तसं होणार नाही. TTE प्रवाशांना फक्त 10 मिनिटांचा वेळ देणार आहे.
3/5

आता चेकिंग कर्मचारी ज्या स्टेशनपासून तिकीट काढलं तेच ग्राह्य धरतात आणि प्रवाशाच्या आगमन किंवा अनुपस्थितीबद्दल माहिती घेतात. पूर्वी ही यंत्रणा कागदावरच राहायची, त्यात टीटीई पुढच्या स्टेशनपर्यंत थांबायचे.
4/5

रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशनच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने एका दैनिकात लिहिलं आहे की, आता ज्या स्थानकावरून प्रवास करायचा आहे त्या स्थानकावरुनच ट्रेनमध्ये चढावं लागेल.
5/5

बोर्डिंग स्टेशनपासून 10 मिनिटांनंतरही सीटवर कोणी आढळलं नाही तर अनुपस्थितीची नोंद केली जाईल. गर्दी असताना टीटीईला तुमच्या सीटवर यायला वेळ लागतो ही वेगळी गोष्ट. त्यामुळे हे लक्षात ठेवा की सीट जिथे आहे, तिथे वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे.
Published at : 19 Jul 2023 12:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
