एक्स्प्लोर
Coronavirus : काळजी घ्या! पुन्हा कोरोना संसर्ग वाढतोय, एका दिवसात एक हजारहून अधिक रुग्ण
Coronavirus Cases in India : देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गामुळे चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

Coronavirus Cases in India Today
1/10

देशात एका दिवसांत एक हजारहून अधिक नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत.
2/10

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 129 दिवसांनंतर देशात सर्वाधिक कोरोनाबाधित सापडले आहेत.
3/10

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 1071 नवीन रुग्ण सापडले आहे. दरम्यान, यातील सुमारे 200 हून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत.
4/10

भारतात 129 दिवसांनंतर एका दिवसात 1,000 हून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहेत. सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 5,915 असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
5/10

मागील 24 तासांत एकूण 1,071 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
6/10

महाराष्ट्र, केरळ आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,30,802 झाली आहे.
7/10

देशात नव्याने सापडलेल्या कोरोना रुग्णांपैकी 236 रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
8/10

महाराष्ट्रात सध्या 1308 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.
9/10

आरोग्य विभागाकडून सर्व प्रकरणांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचं काम सुरु आहे. केंद्र सरकारनेही राज्यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत.
10/10

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,46,95,420 इतकी झाली आहे. एकूण रुग्णांपैकी सध्या 0.01 टक्के रुग्ण सक्रिय आहेत.
Published at : 20 Mar 2023 03:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion