एक्स्प्लोर
Coronavirus : संसर्ग कमी मात्र धोका कायम; देशात 1946 सक्रिय रुग्ण, सध्याची परिस्थिती काय?
Coronavirus Cases in India : देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. ही दिलासादायक बाब आहे.
Coronavirus Cases Today in India
1/10

देशात गेल्या 24 तासांत 145 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.
2/10

सध्या देशात 1946 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर उपचाराधीन रुग्णांमध्ये 16 रुग्णांची घट झाली आहे.
3/10

कोरोना महामारी सुरु झाल्यापासून देशात 4,46,81,650 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
4/10

देशात आतापर्यंत चार कोटीहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली असून एकूण 5,30,728 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
5/10

देशव्यापी कोरोना लसीकरणात 220 कोटीहून अधिक कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. सरकार सध्या कोविड चाचण्या आणि लसीकरणावर अधिक भर देत आहे.
6/10

आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना लसीकरणासाठी आणि बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे.
7/10

दरम्यान, जगभरात कहर माजवणाऱ्या XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. ही चिंताजनक बाब आहे.
8/10

जगभरात कहर माजवणाऱ्या XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. देशात सध्या XBB.1.5 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे. याशिवाय BF.7 व्हेरियंटचे भारतात 14 रुग्ण सापडले आहेत.
9/10

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी विमानतळावर कोविड चाचणी करण्यात येत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहता खबरदारी म्हणून ही पाऊले उचलली जात आहेत.
10/10

कोरोना रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात येत आहेत.
Published at : 20 Jan 2023 01:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























