एक्स्प्लोर

कोळसा घोटाळा: ईडीने समन्स बजावलेले अभिषेक बॅनर्जी आहेत तरी कोण?

1/8
कोळसा घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. या प्रकरणात ईडीला अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीची चौकशी करायची आहे. दोघांनाही वेगवेगळ्या दिवशी चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

2/8
अभिषेक बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. अभिषेक बॅनर्जी हे डायमंड हार्बरमधून तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. 34 वर्षीय अभिषेक गेल्या 11 वर्षांपासून ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या युथ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

3/8
अभिषेक हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मोठा भाऊ अजित यांचा मुलगा आहे. लहानपणापासून ते ममता बॅनर्जी यांच्यासोबत आहेत. पश्चिम बंगालमध्ये अभिषेक हा दीदींचा लाडका असल्याचे बोलले जाते. आगामी काळात अभिषेकने पक्षात आपले स्थान घ्यावे अशी ममता बॅनर्जी यांची इच्छा आहे. मात्र, यावर तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

4/8
अभिषेक बॅनर्जी यांचे कोलकाता येथील कालीघाट येथे एक आलिशान घर आहे. या घरात सर्व सुख-सुविधा असल्याचे सांगितले जाते. लोकसभेतील सर्वात तरुण खासदारांमध्ये त्यांची गणना होते. संसदपटू म्हणून अभिषेक यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला आहे.

5/8
कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडी प्रथम अभिषेक बॅनर्जी यांची २१ मार्चला आणि त्यानंतर २२ मार्चला रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी करेल. त्याचवेळी, दिल्ली उच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी त्यांना संचालनालयासमोर हजर राहण्यासाठी बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती.

6/8
गेल्या वर्षी 10 सप्टेंबर रोजी या दाम्पत्याला समन्स बजावण्यात आले होते आणि त्यांना राष्ट्रीय राजधानीत ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याने त्यांना दिल्लीत हजर राहण्यासाठी समन्स बजावू नये, असे निर्देश ईडीला द्यावेत, अशी विनंती या दाम्पत्याने न्यायालयाला केली होती.

7/8
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्लीमध्ये एजन्सीच्या कार्यालयात बॅनर्जी यांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. रुजिरा बॅनर्जी यांनाही चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती, मात्र कोरोना विषाणू संसर्गाचा हवाला देत त्या हजर झाल्या नाहीत.

8/8
सीबीआयने नोव्हेंबर 2020 च्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे. कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या अवैध धंद्यातून मिळालेल्या पैशाचे TMC खासदार लाभार्थी असल्याचा दावा ईडीने केला आहे. मात्र, बॅनर्जी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!

संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला

Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 26 March 2025Eknath Shinde Vidhan Parishad Speech | कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, ठाकरेंवर हल्लाबोलUjjwal Nikam On Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुनावणी, कोर्टात काय घडलं? वरिष्ठ वकील निकमांनी सांगितली A TO Z माहितीABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मे पासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल

मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Kumar Mishra : ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
Embed widget